ऊस खरेदी केंद्र इतर साखर कारखान्यांना जोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

अमरोहा : ऊस सहकारी संस्थेच्या अमरोहा येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुमारे दोन डझनहून अधिक ऊस खरेदी केंद्रे इतर साखर कारखान्यांना देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. ऊस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी परिसरात नवीन ऊस खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त उसाची आवक होणाऱ्या केंद्रांमधील व्यवस्था सुरळीत करावी, असा प्रस्ताव शेतकऱ्यांनी दिला.

‘लाईव्ह हिंदूस्थान’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भगतसिंग बॉबी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. भगतसिंग बॉबी यांनी आगामी गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये वेव्ह साखर कारखाना सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे ते म्हणाले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस खरेदी केंद्रासंबंधीच्या समस्या मांडल्या. शेतकऱ्यांनी दोन डझन ऊस खरेदी केंद्रे स्थलांतरीत करण्याची मागणी केली.

साखर कारखानदारांनी वेळेवर तोडणी स्लीप दिल्या नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. २० हून अधिक ऊस खरेदी केंद्रांवर जादा ऊस आवक होते. याबाबत शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. भारतीय किसान युनियनच्या शंकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवाकर सिंह चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. ऊस सहकारी संस्था व ऊस विकास परिषदेची लवकरच निवड करून मंडळ स्थापन करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुकुल वीर सिंग, धर्मेंद्र सिंग, झाकीर, बुध सिंग चौहान, अजित सिंग, सुखबीर सिंग, शाजिद, कुलदीप सिंग, ज्योती सिंग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here