पंजाबमध्ये थकीत ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

पंजाबमधील शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा देशव्यापी शेतकरी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता काही शेतकरी संघटना धरणे आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. गोल्डन संधार साखर कारखाना लिमिटेडने शेतकऱ्यांची ७२ कोटी रुपयांची ऊस बिले दिली नसल्याने शेतकऱ्यांना दिल्ली-अमृतसर महामार्गाच्या एका लेनवर आंदोलन सुरू केले आहे. जर लवकर पैसे मिळाले नाहीत, तर महामार्गाची दुसरी लेनही अडवू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलनाची घोषणाही केली आहे. १५५ कोटी रुपयांच्या जमिनीचा खुला लिलाव हेही शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचे कारण आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांचे ७२ कोटी रुपये थकीत आहेत. २०१९-२० मध्ये ३० कोटींची थकबाकी होती. २०२०-२१ मध्ये सात कोटी रुपये थकीत होते. तर २०२१-२२ मध्ये ३५ कोटी रुपये थकीत आहेत. पंजाबमधील चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे हजारो रुपये कारखान्याकडे अडकले आहेत. ऊस हंगाम संपल्याने कारखाना बंद आहेत. कारखान्याचे मालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला जाऊ शकत नाही. या कारखान्याचे मालक सध्या परदेशात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here