ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

उत्तराखंड शेतकरी मोर्चा (अराजकीय)च्या पदाधिकाऱ्यांनी सहदंडाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सरकार शेतकऱ्यांचे शोषण करीत असल्याचा आरोप केला. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतरही सरकारने अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही. यामुळे दर माहीत नसताना शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्यांना पाठवावा लागत आहे. सरकारने तातडीने ऊस दर जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तराखंड शेतकरी मोर्चा (उकिमो) च्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून धरणे आंदोलन केले. आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी पवन सिंह होते. आंदोलनाचे संचलन दीपक पुंडीर यांनी केले. उकिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी गुलशन रोड यांनी सांगितले की, यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र, सरकारने ऊस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस आधीच कारखान्यांना सोपविण्याची वेळ आली आहे. जर सरकारने लवकर दर जाहीर केला नाही, तर शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल. चौधरी मेहकार सिंह यांनी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असल्याचे सांगितले. इकबालपूर कारखान्याने थकीत ऊस बिले देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आंदोलनात धर्मवीर प्रधान, सुरेंद्र लंबरदार, पवन त्यागी, समीर आलम, इकबाल हसन, संदीप, दुष्यंत, सतवीर सिंह आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here