ऊस शेतीपासून शेतकरी दूरावले, दोन हजार हेक्टर लागवड घटली

गाजियाबाद : साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे मिळण्यास होणारा उशीर आणि दरवाढ न झाल्याने शेतकरी ऊस शेतीपासून दुरावत चालले आहेत. यंदाच्या, २०२०-२१ या गळीत हंगामात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागण कमी झाली आहे. या शेतकऱ्यांना उसाऐवजी इतर पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. याशिवाय, पैसे लवकर मिळत असल्याने शेतकरी गुऱ्हाळांना ऊस देऊ लागले आहेत. अशीच स्थिती राहीली तर ऊस पिकापासून दूर जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशसह हापूड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. शेतकरी आधीच केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांचा विरोध करीत आहेत. अशातच सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऊस दरात वाढ करेल अशी शक्यता होती. मात्र तीन वर्षांपूर्वीचाच ऊस दर यंदाही लागू करण्यात आला. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. दरवाढ न झाल्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत.
हापूड जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. एकतर उसाचा दर कमी आहे. दुसरीकडे कारखान्यांकडे गेल्या गळीत हंगामातील ऊस बिले थकीत आहेत. हापूड जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांकडे गळीत हंगाम २०१९-२० यामधील १०७ कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. दरवर्षी अशाच अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

त्यामुळे गळीत हंगाम २०२०-२१ या वर्षात शेतकऱ्यांनी उसाची लावण घटवली आहे. दोन हजार हेक्टर कमी क्षेत्रावर उसाची लागवड कमी झाली आहे. त्याऐवजी इतर पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. ऊस बिले मिळण्यास उशीर होत असल्याने शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघरांना देत आहेत. तेथे दर कमी असला तरी पैसे त्वरीत दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होत आहे. ऊस विभाग शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत असल्याचे सांगते. मात्र, कारखान्यांवर याचा परिणाम होत नसल्याचे दिसून येते.

ऊस उत्पादक शेतकरी होत आहेत कर्जदार
साखर कारखान्यांतर्फे ऊसाची बिले वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बँका आणि सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. त्याच्या परतफेडीसाठी व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसतो. गेल्या दोन वर्षांची बिले थकीत आहेत. कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे अडवले आहेत. दैनंदिन खर्चासाठी शेतकऱ्यांना इतरत्र हात पसरावे लागत आहेत. जिल्ह्यात २०२०-२१ या हंगामात ३८ हजार ९४५ हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. त्याआधीच्या वर्षी, २०१९-२० या कालावधीत ४१ हजार हेक्टरवर ऊस पिक घेण्यात आले होते. दुसरीकडे सिंभावली साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ९१ कोटी रुपये थकीत आहेत. तर बृजनाथपूर कारखान्याकडे १७ कोटी रुपये थकीत आहेत.

याबाबत जिल्हा ऊस अधिकारी निधी गुप्ता यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले मिळावीत, उसाचे पैसे वेळेवर मिळावेत यासाठी कारखान्यांवर दबाव आणला आहे. कायदेशीर कारवाईही केली जात आहे. शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here