ऊसाची उत्कृष्ट शेती केल्याबद्धल शेतकर्‍याचा सन्मान

91

सीतामढी : शिवहर जिल्ह्यातील परसौनी ब्लॉक अंतर्गत कुम्मा येथील शेतकरी अरुण शर्मा यांना रीगा साखर कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक शशि गुप्ता यांनी सन्मानित केले. अरुण शर्मा यांनी उसाची शेती चांगल्या पद्धतीने करुन अधिक उत्पादन असणार्‍या जातीच्या ऊसाची लागवड करुन ऊसाचे मोठे उत्पादन घेतले यासाठी कारखान्याचे महाव्यवस्थापक गुप्ता यांनी त्यांना मंगळवारी प्रशस्ती पत्रक देवून सन्मानित केले. गुप्ता यांनी सांगितले की, अरुण शर्मा सारखे शेतकरी क्षेत्रामध्ये ऊसाचे उत्पादन वाढवण्याचे काम करत आहे. सर्व शेतकर्‍यांनी चांगले उत्पादन देणारा ऊस लावावा. यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी मुकेश धामा, ऊस महाव्यवस्थापक यशवीर सिंह, उप महाव्यवस्थापक सी वी चौधरी, जितेंद्र बैठा, नंद किशोर ठाकूर मधुवेनदर सिंह यांच्यासह अन्य शेतकरी तसेच साखर कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here