भाताऐवजी ऊस शेती करताहेत छत्तीसगढमधील कवर्धातील शेतकरी

52

कवर्धा : छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात उसाचे लागवड क्षेत्र वाढले आहे. भात पिकाऐवजी शेतकरी ऊस उत्पादनाला प्राधान्य देत आहेत. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहिली तर भाताचे लागवड क्षेत्र घटले आहे. तर उसाचे लागवड क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. यादरम्यान उसाचे क्षेत्र ३२ हजार हेक्टरवर पोहोचणार आहे. शेतकऱ्यांना हे पिक जादा उत्पन्न देणारे वाटत आहे. याशिवाय राज्य सरकारकडून सुरू असलेल्या पिक बदलातील योजनेचा लाभही शेतकऱ्यांना मिळत आहे.

भाताऐवजी ऊस पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार भात पिकाला अधिक मेहनत, देखरेख आणि खर्च येतो. या तुलनेत ऊस पिकासाठीचा उत्पादन खर्च खूप कमी आहे. यासोबतच भाताच्या तुलनेत उत्पन्न अधिक आहे.

याबाबत हिंदी न्यूज१८ डॉट कॉमवरील वृत्तानुसार, कवर्धा जिल्ह्यात दोन साखर कारखाने आहेत. गुळाचे उत्पादन केंद्रही आहेत. भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष डोमन चंद्रवंशी यांनी सांगितले की, कवर्धामध्ये ऊस कारखाना असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची सहजपणे विक्री होते. या शिवाय राज्य सरकारकडून पिक परिवर्तनासाठी राजीव गांधी न्याय योजनेअंतर्गत ९ हजार रुपयांचे अनुदानही उपयुक्त ठरत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दरवर्षी ऊस लागवड क्षेत्रात वाढ दिसून येत आहे. जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक मोरध्वज डड़सेना यांनी सांगितले की, भाताचे समर्थन मूल्य २५०० रुपये केल्यानंतरही शेतकरी ऊस शेतीकडे वळले आहेत. २०१९ मध्ये ऊस लागवड क्षेत्र १९ हजार हेक्टर होते. ते आता २२ हजार हेक्टर झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here