उत्तराखंडमधील शेतकऱ्यांनाही ऊस दरवाढीची आशा

डेहराडून : उत्तर प्रदेशनंतर आता उत्तराखंडमध्येही ऊस दरवाढ करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. योगी यांनी ऊस दरात २५ रुपये वाढ केली आहे. त्यामुळे आता उत्तराखंडच्या शेतकऱ्यांमध्येही ऊस दर वाढीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हिंदुस्तान डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, उत्तराखंड सरकार लवकरच ऊस दरवाढीची घोषणा करू शकते. राज्य सल्लागार समिती, ऊस दराच्या स्थितीचा आढावा घेत आहे. त्यानंतर लवकरात लवकर बैठक बोलावून ऊस दराबाबत विचार-विनिमय केला जाईल.

उत्तराखंडमध्ये शेतकऱ्यांनीही ऊस दरवाढीची मागणी केली आहे. अलिकडेच काही राज्यांमध्ये ऊस दरात वाढ करण्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबचा समावेश आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here