ऊस बिल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

सोलापूर : वारंवार मागणी करूनही सिद्धेश्वर सहकारी कारखान्याकडून शेतकऱ्यांची ऊस बिले देण्यास टाळाटाळ होत आहे. ऊस बिले मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांची भेट घेतली आणि त्यांना अडचणी सांगितल्या. तसेच, आंम्हाला आत्महत्या करु द्या, अशी विनंतीही निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी सुरेश जगताप, महादेव साळुंखे, सय्यद शेख, सुभाष पाटील, धर्मराज साळुंखे, जगन्नाथ आमणे, कल्याण मगर, निर्मला पाटील, पोपट मगर, शेषराव गोरे, विठ्ठल गोरे, सविता पवार, मोहन माने, शाझाज माने, सुरेश माने, सुंदरराव गोरे, सुनिता गोरे आदी शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.

केंद्र सरकारने २०१९-२० च्या हंगामासाठी उसाची एफआरपी किंवा किमान आधारभूत किंमत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. उत्तर प्रदेशात जवळपास दहा हजार कोटींची थकबाकी असून, देशात एकूण १५ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. देशात अनेक ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी सरकारवर दबाव टाकत आहेत. आंदोलने छेडत असून, सरकारकडे ऊस बिल थकबाकी दूर करण्याची मागणी करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here