बैकुंठपुर : आधुनिक ऊस प्रशिक्षणासाठी सिधवालियाच्या भारत शुगर मिल्सच्यावतीने ५० शेतकऱ्यांचा गट समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूरला रवाना झाला. साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक शशी केडिया यांनी शेतकऱ्यांच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवला. साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील विविध गावांतील प्रगतीशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षणासाठी हसनपूरला पाठवले आहे, असे ऊस विभागाचे उप सरव्यवस्थापक आर. के. सिंह यांनी सांगितले.
‘लाईव्ह हिंदूस्थान’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या शेतकऱ्यांना हसनपूरमध्ये कमी खर्चात आणि कमी जमिनीत ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे याबाबत माहिती दिली जाईल. शेतकऱ्यांना उसासोबत आंतरपिके लावण्याची मूलभूत शिकवणही दिली जात आहे. गेल्या आठवड्यातसुद्दा ४० शेतकऱ्यांचा गट हसनपूरला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आला होता. आता हे प्रशिक्षण घेवून परतलेले शेतकरी त्यांच्या गावातील इतर शेतकर्यांना ही माहिती देत आहेत. यामध्ये ऊस विभागाचे उपाध्यक्ष संतोष कुमार सिंह, ऊस व्यवस्थापक पंकज सिंह, मनोज कुमार सिंह, शैलेंद्र कुमार सिंह, विभागीय अधिकारी अजीत सिंह, राजेश सिंह, जय बहादुर सिंह, अंगद यादव, धर्मेन्द्र यादव आदींचा समावेश होता.