दोनशे गावात होणार ऊस शेतकऱ्यांचे मेळावे

122

गोरखपूर : पिपराईच साखर कारखाना अद्याप गाळप क्षमतेच्या तुलनेत ऊस उत्पादनात आत्मनिर्भर झालेला नाही असे कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक निर्मल कुमार सिंह यांनी सांगितले. या उद्दीष्टाची पूर्तता करण्यासाठी २०० गावांमध्ये ऊस उत्पादकांचे मेळावे घेण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना आडसाली ऊस लागवडीसंदर्भात जागृत केले जाणार आहेत.

कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांच्या निर्देसानुसार सोमवारपासून आडसाली ऊस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्षेत्रात मेळावे आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. या बैठकांमध्ये ऊस विभागाचे व्यवस्थापक प्रसाद दीक्षित, ऊस विकास अधिकारी अजित कुशवाहा, सुरेश वर्मा, उत्कर्ष मद्धेशिया, महताब अली, ओंकार सिंह, अनिल तिवारी, ऊस पर्यवेक्षक आशुतोष पांडेय, दिनेश शर्मा, रविशंकर उपाध्याय, सत्यनारायण कनौजिया, सतीश चौरसिया, शिवशंकर मिश्रा, सेराज अहमद, उमाशंकर यादव, सूरज शुक्ला, सतीश गुप्ता, अरुण कुमार, बासुकीनाथ, बृजमोहन यादव, अष्टभुजा तिवारी, संदीप गुप्ता, रविन्द्र शर्मा आदी उपस्थित होते.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here