साखर कारखान्याने आयोजित केली शेतकरी सभा

116

जरवलरोड(बहराइच): इंडियन पोटॅश लिमिटेड साखर कारखान्याने गावागावात जावून शेतकर्‍यांच्या सभेचे आयोजन केले. यामध्ये शरदकालीन ऊस लागवड आणि ऊसावर पडणार्‍या रोगांवरच्या उपायांबाबत चर्चा करण्यात आली.

नसिरगंज आणि पारा गावात आयोजित शेतकरी सभेमध्ये शेतकर्‍यांच्या समस्या ऐकून त्याच्या निराकरणाबाबत उपाय सांगण्यात आले. तसेच आगामी गाळप हंगामामध्ये कारखाना वेळेत सुरु करणे आणि शेतकर्‍यांच्या प्रत्येक समस्येबाबत जागरुक राहण्याबाबतचे अश्‍वासन कारखाना व्यवस्थपानाने दिले. कारखान्याचे महाव्यवस्थापक अरुण कुमार भाटी यांनी सांगितले की, साखर कारखाना यावर्षी वेळेत सुरु केला जाईल. यामुळे शेतकर्‍यांना गहू आणि तेलबियांच्या पीक लागवडीबाबत अडचण येवू नये. ऊस व्यवस्थापक ठाठ सिंह राणा यांनी सांगितले की, शेतकरी शरदकालीन ऊसाची लागवड करतील. यावेळी सीपी सिंह, शेतकरी रामराज यादव, मनोज, महेश सिंहण, अनुराग पांड्ये, महेंद्र यादव, बडकउ आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here