पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा फज्जा

136

खामगाव : बुलढाण्यात जिल्ह्यात पंतप्रधान मंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एका शेतकर्‍याचे पैसे दुसर्‍या शेतकर्‍याच्या खात्यात जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय या योजनेचा लाभ काहीच शेतकर्‍यांना मिळाला असल्याचेही निदर्शनास आले आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि शासकीय लालफितीचा कारभार यामध्ये ही रक्कम अद्यापही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. संगणकातील युनिकोट प्रणालीत असणार्‍या काही त्रुटींमुळे प्रदीप या नावातील दीपचे लाईट तर वाघ अडनावाचे टायगर असे भाषांतर झाले आहे, या दुरुस्तीसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. 12 कोटी शेतकर्‍यांना सन्मान निधी योजनेचा फायदा झाल्याचा दावा सरकार करीत असले तरी, प्रत्यक्षात असे झाले नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले आहे.

शेतकरी विनोद हरमकार म्हणाले, मी या योजनेसाठी अर्ज केला आहे. पण सन्मान निधीचे माझे पैसे दुसर्‍याच्याच खात्यावर जमा झाल्याचे मला समजले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी सन्मान निधी पोटी 2000 रुपये शेतकर्‍यांना देण्याचे ठरवले पण तो निधी आता त्रासदायक ठरु लागला आहे. काही शेतकर्‍यांच्या नावांमध्ये, अकाउंट नंबर मध्ये घोळ आहे. हा सन्मान निधी असेल तर तो सन्मानाप्रमाणेच मिळायला हवा.

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here