कर्नाटकमध्ये ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू

मंड्या : कर्नाटक राज्य किसान संघाच्या (Karnataka State Farmers’ Association) नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मंड्याच्या उपायुक्त कार्यालयाला घेराव घातला. उसाला योग्य आणि लाभदायी दर देण्याच्या मागणीबाबत आठवडाभर राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सरकारने कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याबद्दल निदर्शने केली.

संतप्त आंदोलकांनी सरकारच्या उदासिन भूमिकेबद्दल आपला राग व्यक्त करत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेचे दहन केले. शेतकरी संघटाचे अध्यक्ष बडागलापुरा नागेंद्र यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सरकारने ऊसाचा प्रती टन दर ४,५०० रुपये जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनकर्त्यांनी महामार्गावरच ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुनीता पुत्तननैया, नंदिनी जयराम, ए. एल. केम्पेगौडा, एस. सी. मधुचंदन आणि प्रसन्ना कृषी आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here