अमृतसर : शेतकऱ्यांना उसाची थकबाकी न मिळाल्याने जम्हूरी किसान सभा, किरती किसान युनियन आणि ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अजानाला गावातील भलापीड येथे कारखान्यासमोर धरणे आंदोलन केले. सरकार आणि कारखान्याच्या व्यवस्थापकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने उसाच्या दरात अतिशय कमी वाढ केल्याबद्दलही शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
शेतकरी नेते शीतल सिंह, धनवंत सिंह खरआए कला, बलकार सिंह दुधाला, कुलवंत सिंह गिल आणि सतनाम सिंह यांनी सांगितले की सरकार आणि कारखाना प्रशासन यांची मिलीभगत आहे. दोन्हीकडून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. उसाच्या पिकाचे पैसे कारखान्याने गेल्या अनेक दिवसांपासून दिलेले नाहीत. सरकारचे कारखान्याला पाठबळ असल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अजनाला कारखान्याच्या व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांचे नऊ कोटी रुपये थकवले आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी उसाचा दर प्रती क्विंटल ४०० रुपये करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने उसाचा दर ३२५ रुपये करण्याचा घेतलेला निर्णय अमान्य असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link