उत्तर प्रदेश: जहाँगीराबाद परिसरातील साखर कारखान्याच्या क्षमता वाढीसह शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांची पूर्तता व्हावी या मागणीसाठी अनेक गावातील शेतकऱ्यांनी रालोदच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन केले. रालोदचे नेते आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य सुनील चरौरा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धरणे आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा केली जात असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांनी आपल्या पाच मागण्यांचे निवेदन मुख्य प्रबंधकांना दिले.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील तीसहून अधिक गावातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत रालोदचे नेते सुनील चरौरा यांच्या नेतृत्वाखाली कारखाना परिसरात धरणे आंदोलन केले. रालोद नेते चरौरा म्हणाले, साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ झाली नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांचा ऊस अनेक दिवस गाळपाविना शेतात राहतो.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीचंद शर्मा होते. तर गजनफर अली यांनी सूत्रसंचालन केले. रालोदचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव चौधरी, माजी आमदार होशियार सिंह, सुनील सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पाठिंबा दिला. या धरणे आंदोलनात रालोदचे माजी जिल्हाध्यक्ष आसिफ गाजी, शेतकरी नेते पिंकी खालौर, अरविंद चौधरी, लखमा चौधरी, हरविंदर सिंह, इकपाल सिंह, राकेश चौधरी, प्रमोद विद्रोही, तुषार चौधरी, राजू खेड़ी, उम्मेद अली, विशाल चौधरी, प्रमोद शर्मा, डब्बू रुठा, पवन लोधी, विराट लोधी, राजू डूंगरा जाट आणि भानु प्रताप सिंह आदींचा सहभाग होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link