संतापलेल्या शेतकर्‍यांचा कारखान्याच्या गेटवर गोंधळ

शाहजहांपूर : ऊस रिजेक्ट केल्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी आपल्या सहकार्‍यांसह कारखान्याच्या गेटवर जमून मोठा गोंधळ केला. तिथे सुरु असणारे वजन काम बंद केले. शेतकर्‍यांचा आक्रोश पाहून कारखान्याचे कर्मचारी तेथून पळून गेले. हे समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी शेतकर्‍यांना समजावून हे प्रकरण शांत केले. मंगळवारी साखर कारखान्याच्या वजन ट्रॉलीवर ग्राम हरभानपूर निवासी जितेंद्र यांनी आपला ऊस आणला होता. ऊस अधीक्षक रणवीर सिंह यांनी तो ऊस अनुपयुक्त सांगून रिजेक्ट केला आणि तौल लिपिक ने ऊसाचे वजन करण्यास नकार दिला. यावर जितेंद्र आणि त्यांचे सहकारी संतापले. आणि त्यांनी हंगामा सुरु केला.

कारखान्याच्या अधिकार्‍यांवर माफियाचा अनुपयुक्त प्रजातीच्या ऊसाची खरेदी केल्याचा आरोप केला. प्रधान प्रबंधक शेर बहादुर यांनी याची सूचना एसडीएम मोइनुर इस्लाम यांना दिली. एसडीएम यांच्या निर्देशावर घटनास्थळावर पोचलेल्या पोलीसांनी शेतकर्‍यांना समजावून हे प्रकरण शांत केले. प्रधान प्रबधक यांनी सांगितले की, सुपरवाइझर यांनी सांगितल्यानुसार ऊस अनुपयुक्त प्रजातिचा आहे. पण त्याची तपासणी केली जाईल, जर ऊस योग्य असेल तर त्याचे वजन केले जाईल. या वेळी अहिबरन लाल, मान सिंह, राजेंद्र सिंह, सुरेश पाल, राजपाल, राम पाल गंगवार, राजकिशोर, जितेंद्रकुमार, सुल्तान, हसीम बेग आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here