भूना साखर कारखाना सुरु करण्यासाठी शेतकर्‍यांनी उठवला आवाज

फतेहाबाद: भूना साखर कारखाना सुरु करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती हरियाणा, विभाग कमिटी भूना च्या आवाहनावर शेतकर्‍यांनी मंगळवारी भूना मध्ये निदर्शने केली. भूना साखर कारखान्याच्या गेटवर घोषणाबाजी करुन शेतकर्‍यांनी पुतळा जाळला आणि इशारा दिला की सरकारने भूना साखर कारखाना पुन्हा सुरु केला नाही तर शेतकरी आंदोलन तिव्र करतील.

संघर्ष समितीचे ब्लॉक अध्यक्ष दर्शन सिंह कुलां यांनी संयुक्त पणे आंदोलनाचे नेतृत्व केले. तर जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश हसंगा व चांदी राम कडवासरा मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. शेतकरी नेता कडवासरा यांनी सांगितले की, साखर कारखाना बंद असल्याने शेतकर्‍यांची अवस्था वाईट आहे. कारण क्षेत्रामध्ये दहा हजारापेक्षाही अधिक एकर जमिनीत ऊसाची लागवड झाली आहे. पण आता ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अशी चिंता आहे की, ते पीक कोणाला विकणार. भूना साखर कारखाना बंद झाल्यामुळे शेतकर्‍यांना जींद आणि पंजाब मध्ये जावे लागते. ज्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक तसेच वेळेचेही नुकसान होत आहे.
त्यांनी सांगितले की, भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष सुभाष बराला यांनी शेतकर्‍यांच्या 2 वर्षाच्या अनिश्‍चितकालीन धरणे आंदोलनात पोचून साखर कारखाना सुरु करण्याचे आश्‍वासन दिले होते, पण बराला ने आंदोलन मागे घेवून शेतकर्‍यांबरोबर विश्‍वासघात केला. शेतकरी संघर्ष समिती चे जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश हसंगा यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार शेतकरी विरोधी निती लागू करुन शेतकर्‍यांना विनाशाकडे घेवून चालले आहे. शेतकरी कर्जामुळे पहिल्यापासूनच चिंतेत आहेत आणि आता नकली बी-बियाणे तसेच औषधे यांनी शेतकर्‍यांची कंबरच तोडली आहे. केंद्र सरकारने तीन अध्यादेश लागू करुन शेतकर्‍यांना नरकात टाकले आहे. ज्या विरोधात 17 सप्टेंबरला फतेहबाद मध्ये शेतकर्‍यांची महासभा होणार आहे, ज्यामध्ये आगामी संघर्षाची रणनिती तयार होईल.

यावेळी कर्मचारी नेते कृष्ण कुमार धारणिया, भूना ब्लाक सचिव रोहताश शर्मा, पूर्व कॅप्टन रामकिशन भगासरा, मांगेराम मेडा, महेंद्र सिंह जांडली, भगवान पाल, बलवंत सिंह घोटडू, जिले सिंह जाखड, धर्मपाल सिंह ढाणी डूल्ट, बलबीर दहिया, सतबीर सिंह, पाला राम आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here