जलालाबाद : ऊस बिल देण्यास उशीर होत असल्याने तितावी साखर कारखान्याला ऊस पाठविण्याच्या मागणीवर अडून राहिलेल्या लुहारी गावातील शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी बजाज साखर कारखान्याचे अधिकारी गावात पोहोचले. मात्र, ग्रामस्थांनी ऊस बिले देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत या हंगामात थानाभवन साखर कारखान्याला ऊस देण्यास नकार दिला. त्यानंतर अधिकारी निराश होऊन परतले.
अमर उजालामधील वृत्तानुसार, हसनपूर लुहारी गावातील शेतकऱ्यांनी यंदा थानाभवन येथील बजाज साखर कारखान्याला ऊस देण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी सहकारी समितीला पत्र देवून अधिकाऱ्यांना तितावी साखर कारखान्याचे ऊस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांचा सातत्याने सुरू असलेला विरोध पाहता बजाज कारखान्याच्या ऊस विभागाचे सरव्यवस्थापक जितेंद्र सिंह यांनी आपल्या टीमसोबत येवून शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी ऊस बिले लवकर दिली जातील असे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांनी साफ नकार दिला. शेतकरी आर्येश सैनी, सहकारी समितीचे चेअरमन नरेश सैनी ऊर्फ बिल्ला, ओमपाल, अतर सिंह, सुरेंद्र सैनी, कुलदीप सैनी, पंकज सैनी, अरविंद कुमार आदी उपस्थित होते.