हवामान बदलांतही हे २ ॲप देतील शेतकऱ्यांना सुरक्षा कवच, पिकांची सुरक्षा होणार हाय-टेक

सध्या जगभरात हवामान बदलाची समस्या भेडसावत आहे. निसर्गावर हवामान बदलाचे वाईट परिणाम होताना दिसत आहेत. याचा शेतीलाही मोठा फटका बसला आहे. अचानक बदललेल्या हवामानाचा पिकांवर वाईट परिणाम होतो. कधी विजांचा कडकडाट असतो, पाऊस येतो किंवा कधी कडक सूर्यप्रकाश असतो. मात्र, या घटनांची आधीच माहिती मिळल्यास बचावाची तयारी करून नुकसान बर्‍याच प्रमाणात कमी केले जावू शकते. यासाठी मेघदुत आणि दामिनी हे दोन्ही अॅप सर्वांसाठी उपयुक्त ठरत आहेत. हे मोबाईल ॲप हवामान बदलण्यापूर्वी शेतकऱ्यांना माहिती देतात. ते गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाउनलोड करता येतात.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, स्वदेशी टेक्नॉलॉजीवर आधारित असलेल्या दामिनी मोबाईल ॲपची निर्मिती इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे या संस्थेने केली आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये दामिनी मोबाईल ॲप डाउनलोड करून हवामानसंदर्भात अपडेट तुम्हाला मिळवता येतील. आकाशातून वीज पडण्यापूर्वी अर्धा तास आधी तुम्हाला अलर्ट मिळू शकतो. जर शेतकऱ्याच्या शेतात दहा किलोमीटरच्या परिसरात वीज पडण्याची शक्यता असेल तर ऑडिओ मेसेज अथवा एसएमएसद्वारे माहिती पाठवली जाते. मेघदूत हेही स्वदेशी विकसित ॲप्लिकेशन आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे लाँचिंग केले आहे. हवामानाची क्षणाक्षणाला माहिती यावरून मिळते. याशिवाय पिकांच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जाते.

भारतात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. अनेकदा हवामान बदलामुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम होतो. मात्र, आता या नव्या दामिनी आणि मेघदुत ॲपच्या माध्यमातून नुकसान होण्याची शक्यता कमी होईल. ॲपवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विजेबाबत अलर्ट दिल्यास सावधानता बाळगणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here