आंदोलन संपवून शेतकर्‍यांनी चर्चा करावी: कृषी मंत्री

नवी दिल्ली: केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी सांगितले की, भारत सरकारने कायद्ये खूप विचार करुन बनवले आहेत, शेतकर्‍यांच्या जिवनशैलीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी बनवले आहेत. सरकार चर्चा करुन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तयार आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही कायद्यामध्ये प्रावधानावर आपत्ती असते, प्रावधानावरच चर्चा होते. प्रस्तावामध्ये आम्ही त्यांच्या संकटाचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांनी आंदोलन संपवून चर्चेचा मार्ग स्विकारावा.

कृषी मंत्री यांनी सांगितले की, मी शेतकरी यूनियनच्या लोकांना सांगू इच्छितो, त्यांनी केंद्र सरकारला विरोध करु नये. केंद्र सरकार ने पुढे येवून प्रस्ताव दिला आहे, ज्यामध्ये त्यांच्या मागण्यांचे समाधान करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, थंडी आहे आणि कोरोनाचे संकट आहे, शेतकर्‍यांना मोठा धोका आहे. आंदोलनाने जनतेलाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील जनता अडचणीत आहे. यासाठी जनतेच्या हितार्थ, शेतकर्‍यांच्या हितार्थ त्यांनी आपले आंदोलन संपवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here