रुडकी : ऊस विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत कमीत कमी खर्चात अधिक चांगले उत्पादन कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऊसाच्या लावणीपासून तोडणीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेच्या खर्चात कशी बचत करता येईल याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थानने दिलेल्या वृत्तानुसार, इफ्कोचे विभागीय व्यवस्थापक डॉ. रामभजन सिंह यांनी एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी नेहमीच्या दाणेदार युरियाऐवजी नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रवरुप नॅनो युरीयाची माहिती दिली. ऊस संशोधन संस्था, काशीपूरचे डॉ. सिद्धार्थ कश्यप यांनी सांगितले की, आपल्या परिसरातील हवामान बदलांना अनुसरुन उसाच्या प्रजातींची लागवड करण्याची गरज आहे. उसाच्या लवकर पक्व होणाऱ्या प्रजातींबाबत त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. ऊस संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. दे. पी. एस. मलिक म्हणाले की, ऊसाच्या पिकावर येणाऱ्या किडरोगाच्या नियंत्रणासाठी त्याचे चक्र समजून घेणे गरजेचे आहे. रिना नोलिया यांनी जैविक शेतीविषयतक माहिती देत त्यापासून मिळणारे फायदेही सांगितले.