दुप्पट उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी ऊस लागणीचे क्षेत्र वाढवावे

कैसरगंज : ऊस नगदी पिक असल्याने त्यामध्ये उत्पादन वाढीची शक्यता अधिक आहे. सध्याचा काळ हा ऊसाच्या लागवडीसाठी चांगला आहे. त्यामुळे रिकाम्या होत असलेल्या शेतांमध्ये अधिकाधिक ऊस लावावा असे आवाहन पारले साखर कारखाना परसेंडीचे मुख्य ऊस व्यवस्थापक संजीव राठी यांनी केले. कारखाना कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राठी यांनी शेतकऱ्यांना शेतीच्या व्यवस्थापनाची माहिती दिली. ऊस लागणीवेळी प्रती एकर पाच लीटर बायो एक्सेटॅक्ट, पाच बॅग पारले गोल्ड जैविक खाद्यामध्ये मिसळावे. चांगले बियाणे वापरून त्यावर बिजप्रक्रिया करा अशी सूचना त्यांनी केली.

उसाचे अधिक उत्पादन देणाऱ्या ०११८, १५०२३, ९४१८४, ९८०१४, १३२३५, १४२०१ अशा प्रजातींच्या बियाण्यांचा वापर करावा असे आवाहन राठी यांनी केले. ऊस लागणीत बिज प्रक्रिया, पट्टा पद्धत याला प्राधान्य द्यावे. उसाच्या दोन सरीत योग्य अंतर सोडावे, दोन डोळ्यांच्या कांडीचा वापर करावा. त्यातून उसाला अधिक फुटवे येतील आणि उत्पादन अधिक मिळेल असे ते म्हणाले. ऊस लागण सकाळी अथवा सायंकाळच्या टप्प्यात करावी असेही ते म्हणाले. ऊस व्यवस्थापत राठी यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावांतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कंपनीचे अधिकारी रुचिन, सुभेदार, अखंड तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here