शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या ऊसाच्या बियाण्यांचा वापर करावा : मंत्री

79

पाटणा : ऊस विभागाकडून निश्चित केलेल्या दहा ऊच्च प्रतीच्या ऊस बियाण्यांचा वापर न करणाऱ्या शेतकऱ्यांना इनपुट सबसिडीची लाभ देण्यात येणार नाही असे बिहारचे ऊस उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांनी सांगितले. मु्ख्यमंत्री ऊस विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ऊच्च प्रतिचे बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे.

मंत्री प्रमोद कुमार यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी इनपुट सबसिडीच्या दरांची घोषणाही करण्यात आली आहे. असुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना ऊस बियाणे खरेदीसाठी २४० रुपये प्रती क्विंटल इनपुट सबसिडी दिली जात आहे. इतरांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीचा दर २१० रुपये प्रती क्विंटल आहे.

दरम्यान, कृषी विभागाने सांगितले की, जे शेतकरी शेतांमध्ये पाणी साठल्याने शेती करू शकले नाहीत, त्यांना नंतर भरपाई दिली जाणार आहे. पाणी साचून नुकसान झाल्याची तक्रार करणाऱ्या शेकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी २१ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावे लागतील. याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारने समस्तीपूर, पश्चिम चंपारण, बेगूसराय, चंपारण, बक्सर आणि गोपालगंज या सहा जिल्ह्यात ४८,७८१ हेक्टर जमिनीत ७ सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना ८७.८० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here