शेतकर्‍यांनी ट्वीट करुन मागीतली व्याजासहित उस थकबाकी

150

बदलत्या युगात शेतकर्‍यांनी ट्वीटर वर पोस्ट करुन आपला हक्क मागितला आहे. राष्ट्रीय शेतकरी मजुर संघटनेच्या अध्यक्षतेखाली देशभरातील मुख्य संघटनांशी संंबंधीत शेतकर्‍यांनी व्याजासहित उस थकबाकीचा मुद्दा उठवला.

सरदार वीएम सिंह यांच्या शेतकरी मजूर संघटनेसोबत देशभारात 60 संघटनांचे पदाधिक़ारी आणि शेतकरी या अभियानात सामिल झाले आहेत. कर्जमुक्ती, पूर्ण पैसे, व्याजासहित उस थकाबकी हॅश टॅग सह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ट्वीट करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या तीन अध्यादेशांना शेतकरी विरोधी सांगून रद्द करण्याची मागणी केली. यावर जोर दिला की, जेव्हा शेतकर्‍याकडून विज बिल, कर्ज उशिरा भरल्यास पेनल्टी घेतली जाते, तर मग उस थकबाकी देण्यास विलंब केल्यास व्याज का नाही दिले जात. कारखाने शेतकर्‍यांना पैशाने दुसरे कारभार करुन पैसे मिळवत आहे. संघटनेने असा दावा केला की स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार, उस मूल्य 450 रुपये प्रति क्विंटल असावे. दिवसभरामध्ये देशभरातून दोन लाख शेतकर्‍यांनी ट्वीट करुन आंदोलन तिव्र केले.

ट्वीटच्या माध्यमातून संघटनेने आगामी दिवसांमद्ये शेतकर्‍यांच्या मुद्द्यविषयी जागरुकतेसाठी ट्रॅक्टर – बाइक यात्रेमध्ये सामिल होण्याची विनंती केली. संघटनेचे महासचिव हरबीर सिंह यांनी सांगितले की, गावा गावामध्ये जाऊन सरकारच्या शेतकरी विरोधी अध्यक्षादेशांप्रती जागरुक करू.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here