कर्नाटक: मंड्यामध्ये साखर कारखान्याजवळ ऊसाने भरलेली लॉरी रोखली

मंड्या कर्नाटक : पांडवपुरा सहकारी साखर कारखान्यांतर्गत येणार्‍या ऊसाला दुसर्‍या जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये गाळपासाठी घेवून जात असल्याचा आरोप करुन शेतकर्‍यांनी ऊसाने भरलेल्या लॉरीला रोखले आणि धरणे आंदोलन केले. संतापलेल्या शेतकर्‍यांनी पांडवपुरा कारखान्याजवळ मैसूर रोड वर लॉरी थांबवली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने निरानी शुगर्स ला पांडवपुरा कारखाना लीज वर दीला आहे, जो 11 ऑगस्ट पासून परिचालन सुरु करायला तयार आहे. कारखान्यामध्ये गाळपाची तयारी सुरु आहे आणि अशा स्थितीमध्ये इथला ऊस इतर जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये साखर कारखान्यांकडून खरेदी करणे योग्य नाही.

ते म्हणाले, आम्ही यापूर्वीच उपायुक्तांना एक निवेदन दिले आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडून ऊसाला इतर ठिकाणाहून घेवून जाण्याची अनुमति दिली जावू नये, अशी आग्रही मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली पाहिजेत. शेतकर्‍यांनी इशारा दिला आहे की, जिल्हा प्रशासनाकडून जर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, तर ऊसाने भरलेल्या लॉरीला थांबवणे आणि विरोध करणे अनिवार्य होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here