साखर कारखाने सुरू करण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांची निदर्शने

मुकेरिया (होशियारपूर), पंजाब : खासगी साखर कारखाने ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही सरकारे अद्याप काहीच कार्यवाही न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून बेमुदत आंदोलन सुरू केले. शेतकरी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी मुकेरिया येथे चक्का जाम आंदोलन केले. गेले महिनाभर अनेक ठिकाणी शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.
आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास भाग पाडले जात आहे, असा दावा शेतकरी संघटनांनी केला. जर सरकार शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असते, तर त्यांच्यासोबत झालेल्या संयुक्त बैठकांमध्ये मांडण्यात आलेल्या मागण्या लागू करून अधिसूचना जारी केली गेली असती, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी भाकियूचे (सिरसा) अध्यक्ष बलदेव सिंह सिरसा, गाबा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुखपाल सिंह दफ्फर, भाकियूचे (आजाद) प्रमुख अमरजीत सिंह राडा; भाकियूचे (माझा) सह अध्यक्ष सतनाम सिंह जफरवाल, भाकियू (खोसा) चे महासचिव गुरिंदर सिंह भंगू यांसह इतर नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here