ऊस बिलांसाठी शेतकऱ्याचे सरकारला साकडे

रुडकी : साखर कारखान्यांनी पैसे थकवल्याने शेतकऱ्यांना आणि कुटुंबियांच्या जीवावर बेतू लागले आहे. ताशीपूर गावातील ज्येष्ठ शेतकरी यशपाल त्यागी यांनी सांगितले की, त्यांचा नातू रजतवीर याला गेल्या दोन महिन्यापासून ट्यूमर झाला आहे. त्याचा दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. इकबालपूर साखर कारखान्याकडे त्यागी यांचे ८.५० लाख रुपये ऊस बिल थकीत आहे. त्यांनी सरकारकडे हे पैसे तातडीने मिळावेत यासाठी साकडे घातले आहे.

त्यागी यांनी सांगितले की, अपोलो हॉस्पिटलमध्ये नातवाच्या ऑपरेशनसाठी नऊ लाख रुपयांचा खर्च त्यांना आला आहे. ही रक्कम त्यांनी नातेवाईकांकडून उधार-उसनवारी करून खर्च केली आहे. नातवाच्या उपचारासाठी त्यांना आणखी पैशांची गरज आहे. पैसे उभे करण्यासाठी आपले घर विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नातवाच्या उपचार खर्चासाठी त्यांनी बँकांकडूनही कर्ज काढले आहे. इकबालपूर साखर कारखान्याकडे त्यांचे गेल्या काही वर्षांपासून साडेआठ लाख रुपये थकीत आहेत. हे पैसे सरकारने वसूल करुन द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here