आजपासून धावणार किसान रेल्वे

भारतीय रेल्वे 7 ऑगस्टपासून शेतकरी रेल्वे (किसान रेल) सुरु करणार आहे. शेतकरी रेल्वेचा उपयोग लवकर खराब होणार्‍या ग्राहक वस्तू उदा. फळ आणि भाज्यां सारख्या वाहतुकीसाठी करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मिनिस्टर पीयूष गोयल वीडियो कॉन्फरसिंग च्या माध्यमातून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. ही रेल्वे महाराष्ट्र आणि बिहार दरम्यान असणार आहे. ही पहिली रेल्वे असेल जिच्या माध्यमातून फळ आणि भाज्यांची वाहतुक होईल. यावेळी महाराष्ट्रातील मोठ मोठे राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी यावर्षीे फेब्रुवारी मध्ये सादर केलेल्या बजेटमध्ये लवकर खराब होणार्‍या फळ आणि भाज्यांसारख्या उत्पादनांच्या मालवाहतुकीसाठी शेतकरी रेल्वे धावणार असल्याची घेषणा केली होती. रेल्वे मंत्रालय याप्रकारची पहिली शेतकरी रेल्वे 7 ऑगस्ट ला दिवसा 11 वाजता देवलाली हून दानापूर साठी सुरु करणार आहे. ही रेल्वे दर आठवड्याला वाहतुक करेल. ही रेल्वे 1,519 किलोमीटर चा प्रवास करुन पुढच्या दिवशी जवळपास 32 तासांनंतर संध्याकाळी 06.45 वाजता दानापुर (बिहार) ला पोचेल.

ही रेल्वे नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, मानिकापूर, प्रयागराज, छयुंकी, पं.दीनदयाल उपाध्यायनगर आणि बक्सरमद्ये थांबेल.

सरकारचे लक्ष्य 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढून दुप्पट करण्याचे आहे. याला साध्य करण्यासाठी ही रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमुळे खराब होणारी फळे आणि भाज्यांसारखा माल बाजारांपर्यंत लवकर पोचायला मदत होईल. या रेल्वेमध्ये कोल्ड स्टोंअरेजचीही व्यवस्था आहे ज्यामुळे दूध, मासे, मीट सारखी उत्पादने खराब न होता मोठ्या गतीने देशाच्या एका भागातून दुसर्‍या भागात पाठवली जावू शकतील. यामुळे लवकर खराब होणार्‍या वस्तूंसाठी देशभरामद्ये एक सीमलेस कोल्ड सप्लाय चेन बनवण्यामध्ये सहायता मिळेल.

सेंट्रल रेल्वे चे भुसावळ डिवीजन प्राथमिक पणे कृषी आधारित डिवीजन आहे. आणि नाशिक तथा त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ताजी फळे, भाज्या, फूल तथा इतर कृषी मालाचे उत्पादन होते. या उत्पादनांची योग्य देखभाल केली नाही तर ती लवकर खराब होतात. ही कृषी उत्पादने नाशिकच्या या परिसराबाहेर बिहार मद्ये पटना, उत्तर प्रदेश मद्ये इलाहाबाद, मध्य प्रदेशामध्ये कटनी, सतना तथा इतर क्षेत्रांमध्ये पाठवली जातात.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here