ऊस दरवाढ न झाल्याने शेतकरी नाराज

100

रुडकी : उत्तराखंड किसान मोर्चाच्या मासिक बैठकीत ऊसाचे समर्थन मूल्य सरकारने वाढवले नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून सरकारने दरवाढ केलेली नाही. केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकार करीत असल्याचा आरोप करण्यात आला.

प्रशासकीय भवनात झालेल्या बैठकीत मोर्चाचे अध्यक्ष गुलशन रोड म्हणाले, उसाचा जो दर जाहीर झाला आहे, ती शेतकऱ्यांची फसवणूक म्हणावी लागेल, चार वर्षात दरवाढ झालेली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या नावाखाली धोका दिला जात आहे. दरवाढ न झाल्याने शेतकरी संतप्त आहेत. चार वर्षात अनेक गोष्टींची दरवाढ झाली आहे. मात्र, या भागातील जे मुख्य पीक आहे, त्याचे दर वाढत नाहीत. ऊसाचे पैसे थकल्याने शेतकरी हवालदिल आहेत.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातून शेतकरी माघार घेणार नाहीत अशी घोषणा राजेंद्र सिंह यांनी केली. सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत. सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास उद्रेक होईल असा इशारा त्यांनी दिला. हाजी यासीन बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. दीपक पुंडीर यांनी सूत्रसंचालन केले. महकार सिंह, सुरेंद्र लंबरदार, मोहम्मद आजम, आकिल हसन, राजपाल सिंह, नरेश लोहान, राजकुमार, सतीश त्यागी, रवींद्र त्यागी, वीरेंद्र सैनी, ब्रजपाल सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here