पंजाबमध्ये गळीत हंगामापूर्वी थकीत ऊस बिलांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

चंदीगड : पंजाबमध्ये ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप खासगी साखर कारखान्यांकडून ५३ कोटी रुपयांहून अधिक थकीत ऊस बिलांची प्रतीक्षा आहे.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पंजाबचे ऊस आयुक्त डॉ. गुरविंदर सिंह यांनी सांगितले की, आम्ही महसूल वसुली अधिनियमांतर्गत वसुलीच्या प्रक्रियेबाबत कार्यवाही करीत आहोत. कपूरथलच्या उपायुक्तांनी फगवाडा साखर कारखान्याच्या संचालकांची संपत्ती जप्त केली आहे. उर्वरीत खासगी साखर कारखान्यांनी थकबाकी देण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रसार माध्यमातील वृ्त्तानुसार, राज्यात सात खासगी साखर कारखान्यांशिवाय नऊ सहकारी साखर कारखाने आहेत. विधानसभा निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहेत. गेल्या चार वर्षात प्रथमच काँग्रेस सरकारने गळीत हंगामाच्या सुरुवातीआधी सहकारी साखर कारखान्यांकडील ऊस थकबाकी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here