मोदी सरकारने मान्य केल्या ऊस उत्पादकांच्या 5 मागण्या

शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी उत्तर प्रदेशातील सहारनपूर पासून दिल्लीमध्ये पायी मोर्चा घेवून आलेल्या भारतीय शेतकरी संघटनेच्या 15 पैकी 5 मागण्या मोदी सरकारने मान्य केल्या आहेत. यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेण्याचे जाहीर केले आहे. दिल्लीमध्ये आलेल्या शेतकर्‍यांच्या 11 सदस्यांच्या शिष्टमंडळाने कृषी भवनामध्ये जावून कृषी मंत्रालयातील अधिकार्‍यांबरोबर आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली. यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेण्याचे जाहीर केले.

दिल्लीच्या बॉर्डरवरच या शेतकर्‍यांना थांबवण्यात आले होते. यामुळे संतापलेले शेकडो शेतकर्‍यांनी दिल्ली बॉर्डरवर धरणे आंदोलन केले होते. त्यांची मागणी होती की, सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी किंवा त्यांना दिल्लीतील शेतकरी घाटावर जावू दिले जावे. यानंतर शेतकर्‍यांच्या 11 सदस्यीय शिष्टमंडळाला दिल्ली पोलिसांच्या गाडीतून कृषी मंत्रालयात घेवून जाण्यात आले आणि तिथे त्यांनी आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली.

शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे, शनिवारी दिल्लीतील अनेक मार्गावर ट्रॅफीक जाम झाले होते. दिल्लीच्या आयटीओ पासून दीनदयाल उपाध्याय मार्गावर शेतकर्‍यांच्या रॅलीमुळे दोन्हीकडून वाहतुक बंद करण्यात आली होती. याशिवाय गाजीपूर बॉर्डरच्या यूपी गेट पासून निजामुद्दीन कडे येणार्‍या मार्गावरच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.

शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या :
1. भारतातील शेतकर्‍यांचे कर्ज पूर्ण माफ व्हावे.
2. सिंचनासाठी शेतकर्‍यांना मोफत वीज द्यावी.
3. शेतकरी आणि कामगारांच्या मुलांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत असावी.
4. शेतकरी आणि कामगारांना 60 वर्षानंतर महिना 5,000 पेन्शन मिळावी.
5. पीकाचे मूल्य शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत निश्‍चित करावे.
6. शेती करणार्‍या शेतकर्‍यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास त्यांना शहीद असे संबोधन्यात यावे.
7. शेतकर्‍यांबरोबरच कुटुंबालाही दुर्घटना विमा योजनेचा लाभ मिळावा.
8. पश्‍चिम उत्तर प्रदेशात उच्च न्यायालय आणि एम्स ची स्थापना व्हावी.
9. प्रति गोवंश गोपालकांना 300 रुपये प्रतिदिन मिळावेत.
10. शेतकर्‍यांचे पैसे त्यांना व्याजासोबत लवकर द्यावेत.
11. सर्व दूषित नद्यांना प्रदूषण मुक्त केले जावे.
12. भारतात स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट लागू व्हावा.

सरकारी अधिकार्‍यांशी चर्चा झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, सरकारने त्यांच्या 5 मागण्या मान्य केल्या आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here