शेतकर्‍यांना कर्जमुक्त करणारच: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी लोकांच्या जीवनात गोडवा आणला. या शेतकर्‍यांचे आयुष्य उध्वस्त होत असताना राज्य सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. राज्य सरकारकडून शेतकर्‍यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले असून नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी सन्मान योजना आणली जाईल, असे अश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभात ठाकरे बोलत होते. यावेळी माजी केंद्रीयकृषी मंत्री शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री जयंत पाटील, आम. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह माहिते पाटील, राजेश टोपे, कल्लाप्पाण्णा आवाडे, शिवाजीराव देशमुख आणि विविध साखर कारखान्यांचे अध्यक्ष व शेतकरी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, राज्य सरकारने शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली. यापुढील टप्प्यात दोन लाख रुपयांवरील शेतकर्‍यांना तसेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठीही सन्मान योजना आणली जाईल. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला सक्षम करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांची समिती गठीत करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here