पिक विम्याचा निर्णय आता शेतकरी घेणार

पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकर्‍यांनाच ठरवता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत तीन प्रमुख निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकारपरिषद घेऊन माध्यमांना या बद्दल माहिती दिली.

पंतप्रधान पीक विमा योजनेतील दुरुस्तीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकरी ठरवणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा तब्बल 5.5 कोटी शेतकर्‍यांना लाभ झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकुण 13 हजार कोटींचा विमा उतरण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी यावेळी दिली.

मंत्रिमंडळाने 22 व्या कायदा आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे. ज्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांना माहिती दिली. हा आयोग सरकारला कायदेशीर प्रश्‍नांबाबत सल्ला देण्याचे काम करणार आहे. कायदा आयोगाचा कार्यकाळ यावर्षी ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर कायदा मंत्रालय आता नवीन आयोगासाठी अधिसूचना लागु करणार आहे. नव्या आयोगाचा कार्यकाळा तीन वर्षांचा असणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here