प्रलंबित ऊस थकबाकीच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचे निषेध आंदोलन होणार

90

बिजनौर: भारतीय किसान यूनियन च्या बॅनरखाली शेतकरी ऊस थकबाकी व्याजासहित मिळण्याच्या मागणीसाठी साखर कारखान्याशी संबंधीत 9 ठिकाणी निषेध ओदोलन करणार आहेत. भाकियू चे जिल्हाध्यक्ष कुलदीप सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये 9 साखर कारखाने आहेत. सर्व कारखान्यांमध्ये येणार्‍या थाना परिसरामध्ये बेमुदत निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

बिजनौर, चांदपुर, स्योहारा, धामपूर, अफजलगढ, नगीना देहात, नजीबाबाद, नांगल सोती, हल्दौर आदी ठिकाणी हे आंदोलन होईल. जिल्हाध्यक्ष चौधरी कुलदीप सिंह अधिक माहिती देताना म्हणाले की, तहसील अध्यक्ष प्रमोद कुमार तसेच ब्लॉक अध्यक्ष मोहम्मदपुर देवमल विजय सिंह यांच्या नेतृत्वामध्ये बिजनौर थान्यावर नांगल सोती थान्यावर ब्लॉक अध्यक्ष नजीबाबाद सरदार इकबाल सिंह तसेच ब्लॉक अध्यक्ष मदन चौहान यांच्या नेतृत्वामध्ये हल्दौर थान्यावर ब्लॉक अध्यक्ष उदयवीर सिंह यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होईल. तर भाकियू चे युवा प्रदेश अध्यक्ष दिगंबर सिंह यांनी सांगितले की, प्रलंबित ऊस थकबाकी बाबात होणार्‍या आंदोलनाची रणनिती तयार करण्यात आली आहे. आंदोलना दरम्यान प्रत्येक दिवशी नवी टीम राहील. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टीम तयार झाल्या आहेत. दिगंबर सिंह यांनी सांगितले की, थान्यांवर सोशल डिस्टन्सींग चे पालन करुन आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर मास्क असतील. कोरोनामुळे कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here