शेतकऱ्यांना लवकरच मिळणार थकीत ऊस बिले : जिल्हा ऊस अधिकारी

पिलीभीत : जिल्ह्यातील चारही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसापोटी ७५ टक्के बिले दिली आहेत. आता फक्त २५ टक्के बिले शिल्लक आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्र यांनी दिली. ललित हरी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ६० टक्के ऊस बिले दिली आहेत. बरखेडाच्या बजाज हिंदूस्थान शुगर मिलने आतापर्यंत फक्त २३.३ टक्के ऊस बिले दिली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्र म्हणाले की, चारही साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची १२५४ कोटी १८ लाख रुपयांची ऊस बिले आहेत. यापैकी ९३७ कोटी ७५ लाख रुपये कारखान्यांनी दिले आहेत. आता तीन कारखान्यांवर ३१६ कोटी ४३ लाख रुपये थकीत आहेत असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी ऊस सर्व्हेवेळी शेतामध्ये उपस्थित राहावे. पर्यवेक्षकाकडून पावती घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला. ऊस सर्व्हेचे काम ५७ टक्के पूर्ण झाले आहे. २० जूनपर्यंत सर्व्हे पूर्ण केला जाईल. सर्व सहकारी ऊस विकास समित्यांकडे नॅनो युरिया उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून युरिया घ्यावा असे आवाहन मिश्र यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here