ऊसाला चांगला दर व इतर प्रमुख मागण्या यसाठी महम कारखान्यात आज शेतकऱ्यांचे आंदोलन

रोहतक मध्ये ऊसाचा दर वाढवून 500 रुपये प्रति क्विंटल करण्यासाठी तसेच 14 दिवसाच्या आत पैसे भागवण्यासह इतर प्रमुख आठ मागण्यांसाठी आज शेतकरी महम साखर कारखान्यात आंदोलन करणार आहेत. शेतकरी सभेचे जिल्हा सचिव बलवान सिंह यांनी सांगितले की, ऊसाचा दर वाढवणे आणि इतर मागण्यांसाठी त्यांच्या संघटनेच्या वतीने अभियान सुरु आहे. याच मुद्दयावर आज महम कारखान्यात शेतकरी पंचायत होणार आहे. ते म्हणाले, अशी च पंचायत रोहतक कारखान्यातही आयोजित करण्यात आली आहे. महम कारखाना कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावात जाउन शेतकरी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पंचायतीचे आमंत्रण दिले.
सरकारचे दुर्लक्ष

सचिव बलवान सिंह म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आपल्या पिकाला घेउन शेतकरी कारखान्यात येतात, पण तिथे शेतकऱ्यांना थांबण्यासाठी, विश्रांतीसाठी कसलीही व्यवस्था नाही. स्वच्छतागृहांची दुरावस्था आहे. अशा मध्ये शेतकऱ्यांना कैटीनमध्ये रात्र काढावी लागते.
शेतकऱ्यांचीही दुरावस्था

जिल्हाध्यक्ष प्रीत सिंह म्हणाले, कारखाना प्रशासनाचे शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे लक्ष नाही. देशासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था अधिक खराब होत आहे. पूर्वी कारखान्यात ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना कंट्रोल रेट वर साखर मिळत होती. आता ती ही बंद झाली आहे. जर महागाई वाढली आहे तर ऊस दर का वाढवला जात नाही. महासचिव म्हणाले, शेतकऱ्यांना सरकार 335 व 340 रुपये प्रति क्विंटल रेट देत आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

-साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या विश्रांतीसाठी खोली आणि अंथरूणांची सोय व्हावी

– कंट्रोल रेट वर शेतकऱ्यांना साखर देण्याची योजना पुन्हा सुरू केली जावी

-शेतकरी रंगराजन समितीच्या शिफारसींना हटवावे, एमएसपी वर ऊस खरेदी व्हावी

– साखर कारखाना रोहतक मध्ये सुरु असणाऱ्या फर्जीवाड्याची उच्च स्तरीय तपासणी करावी

– कारखान्यात काम करणाऱ्या श्रमिक आणि कर्मचाऱ्यांच्या अधिकाारांची रक्षा व्हावी

– कारखान्याची क्षमता आणि संख्या वाढवावी

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here