शाहाबाद साखर कारखाना बंद झाल्याने शेतकरी चिंतेत

कुरुक्षेत्र : शाहबाद सहकारी साखर कारखान्याशी संबंधीत हजारो ऊस उत्पादकांना आपला उत्पादित माल विकण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कारखाना प्रशासनाने 1 मे ला कारखान्यातील कर्मचारी कोरोनाग्रस्त सापडल्यानंतर कारखान्यातील गाळप बंद केले आहे. यानंतर दोन साखर कारखान्यांमधील ऊस गाळप करण्याची चर्चा करण्यात आली. शाहबाद कारखान्याकडुन आतापर्यंत 6 लाख क्विंटल अर्थात जवळपास 2,000 एकर ऊसाचे गाळप करणे बाकी आहे.

राज्य सरकारच्या एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याने सांगितले की, ऊस तोडणी शेवटच्या टप्प्यात होती. यापूर्वी, शाहबाद साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने यमुनानगर आणि करनालच्या दोन खासगी कारखान्यां बरोबर उर्वरीत उत्पादनाच्या खरेदीसाठी समझौता केला होता.

यमुनानगर चा सरस्वती कारखाना, शाहबाद कारखान्याशी संबंधीत शेतकर्‍यांचा 3 लाख क्विंटल ऊस गाळपासाठी तयार आहे. पण नंतर भादसों कारखान्याच्या व्यवस्थापनाने गाळप करण्यास नकार दिला. आता, उर्वरीत उत्पादनाला कैथलमध्ये सहकारी साखर कारखान्यामध्ये वाटप करण्यात आले आहे.
शेतकरी चिंतेत आहेत, कारण यामुळे शेतकर्‍यांच्या वाहतुक खर्चात वाढ होणार आणि सरकारकडून कोणत्याही आर्थिक सहकार्याची घोषणा झालेली शेतकर्‍यांना यमुनानगर मध्ये आपले उत्पादन विकण्यासाठी 85 किमी अधिक प्रवास करावा लागेल.

शाहबाद सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख निदेशक सुशील कुमार यांनी सांगितले की, आम्ही जवळच्या कारखान्यांसह उर्वरीत 6 लाख क्विंटल ऊस गाळप करण्याची व्यवस्था केली आहे. पण, आतापर्यंत शेतकर्‍यांना इतर कारखान्यांना आपला माल विकण्यासाठी चर्चा झालेली नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here