डिझेलच्या वाढत्या दरवाढीने शेतकरी हवालदिल

सिलावन : डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य माणसांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. तर शेतकरीही हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी सांगितले की, डिझेल दर वाढीमुळे शेतीवर विपरित परिणाम झाला आहे. या दरवाढीमुळे शेतातील नांगरणी आणि सिंचनाचा खर्च वाढला आहे.

कधी दुष्काळ तर कधी अती पाऊस याच्याशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेलच्या वाढत्या दराने संकटात टाकले आहे. बँका आणि सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना महागड्या डिझेलसह शेतातील नांगरणी, सिंचनाचा खर्च वाढवला आहे. दररोज वाढत असलेले पेट्रोल-डिझेलचे दर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहेत. अलीकडेच खरीपातील पिके पाण्यामुळे वाया गेली. आता नंतरच्या पिकांसाठीची नांगरणी, सिंचन खर्च भागवणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने खास धोरण राबविण्याची गरज आहे. कमी दरात शेतकऱ्यांना डिझेल देता येईल अशी व्यवस्था केली पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतातील ट्रॅक्टर, कल्टीव्हेटर, इतर औजारांसाठी डिझेल गरजेचे असते. तर शेतकऱ्यांना डिझेलपासून दिलासा मिळाला तर खर्च कमी येईल असे कसीरदा गावचे शेतकरी भगवत सिंह यांनी सांगितले. तर बारव गावातील रामस्वरुप म्हणाले, डिझेलचा खर्च वाढल्याने शेतीचा खर्च परवडेनासा झाला आहे. ट्रॅक्टरने नांगरणी, मळणी सारख्या कामांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे नफा घटला आहे. छिल्ला गावचे शेतकरी महेंद्र सिंह राजपूर म्हणाले, शेतकरी नैसर्गिक संकटांना तोंड देत आहेत. त्यातच डिझेल दरवाढीने कंबरडे मोडले आहे. अलीकडेच पावसाने पिके उद्ध्वस्त केली. डिझेलचे दर आता नुकसानीचे कारण बनतील. तर सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेतआणावेत अशी मागणी शेतकरी देवेंद्र सिंह यांनी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here