ऊस गाळपामध्ये कोल्हापूर अग्रेसर

कोल्हापूर : राज्यात आत्तापर्यंत झालेल्या गाळप हंगामात एकूण साखरेच्या उत्पादनात कोल्हापूर व पुणे विभागातच साठ टक्के साखर उत्पादित झाली आहे. सोलापूर, नगर औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत संथ गतीने हंगाम सुरू आहे. नांदेड, अमरावती, नागपूर या विभागात तर नाममात्रच हंगाम सुरू असल्याची स्थिती आहे. पण राज्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्या अखेर 213.81 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक 71.67 लाख टन असाचे गाळप झाले असून 81.38 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

त्या खालोखाल पुणेविभागात 56.62 लाख टन उसाचे गाळप झाले असून सरसरी 10.44 टक्के उतार्‍याने 59.12 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हें दोन विभाग वगळता अन्य विभागात उस गाळप स्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर व पुणे विभाग वगळता अन्य विभागात जानेवारीनंतर साखर कारखाने उसाअभावी बंद होण्याची शक्यता आहे.
सोलापूर, नगर, नांदेड, अमरावती विभागाचा सरासरी साखर उतारा 9 टक्के आहे. औरंगाबाद, नागपूरचा सर्वांत कमी म्हणजे सरासरी 8 टक्के साखर उतारा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बिद्रीच्या दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याचा सरासरी उतारा सर्वाधिक म्हणजे 11.85 टक्क्यांच्या आसपास आहे. या खालोखाल गुरुदत्तटाकळीवाडी, वारणा या कारखान्यांचा क्रमांक आहे. अनेक ठिकाणी अद्यापही पूरबाधित उसाचे गाळप सुरू असल्याने प्रत्येक वर्षी उतार्‍यात आघाडीवर असणार्‍या कारखान्यांना यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्या अखेर पिछाडीवर जावे लागले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here