उसाचे पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

मोरादाबाद : थकीत ऊस बिले मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जर वेळेवर बिले मिळाली नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियूचे राष्ट्रीय सचिव डॉ. नौ सिंह, प्रदेश महासचिव डॉ. चरन सिंह, ऋषिपाल सिंह आणि जिलाध्यक्ष मनोज चौधरी म्हणाले की, शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळण्याची गरज आहे. मुरादाबादमध्ये एक साखर कारखाना वगळता इतरांनी पूर्ण बिले दिलेली नाहीत. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केल्यानंतर चौदा दिवसात पैसे देण्याचा नियम आहे. त्याचे पालन केले जात नाही. साखर कारखान्यांपैकी बेलवाडा, दिवाण तथा बिलारी साखर कारखान्यांकडे कमी पैसे थकीत असल्याचा दावा करताना शेतकऱ्यांनी सांगितले की, विभागातील इतर जिल्ह्यांतही अशीच स्थिती आहे. महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जात आहे, त्यांना बाजारभावाने नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असल्याचे भाकियूच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकरी दिन कार्यक्रमातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, त्यावर तोडगा काढण्यात आलेला नसल्याचा आरोप भाकियूने केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here