कवर्धा जिल्ह्यात शेतात भिषण आग, ४० शेतकऱ्यांचा १०० एकरातील ऊस गळून खाक

दुर्ग : छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यातील बैहरसरी गावात पुन्हा एकदा उसाच्या शेताला भिषण आग लागली आहे. आगीत जवळपास १०० एकरातील ऊस जळून नष्ट झाला आहे. शेतावरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या तारा हे या आगीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांच्या मदतीने आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

कवर्धा जिल्ह्यातील पोंडी पोलिस चौकीअंतर्गत येणाऱ्या बेहरसरी गावात ही आग लागली. उंच आगीच्या ज्वाळा दिसल्यानंतर लोकांची धावपळ उडाली. जवळपास १०० एकर क्षेत्र या आगीत भस्मसात झाले. गावातील ४० हून अधिक शेतकऱ्यांची ही शेती आहे. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ऊसाच्या शेतांवरुन अति उच्च दाबाच्या तारा गेल्या आहेत. या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडली असावी अशी शक्यता आहे. स्थानिकांच्या मदतीने आणि अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी जवळपास ३ ते ४ तासांनी आग आटोक्यात आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here