मेरठमधील साखर कारखान्यात भीषण आग, टर्बाइन फुटून अपघातात एक ठार

मेरठ: परतापूर क्षेत्रातील मोतीपूर साखर कारखान्यात दुपारी अचानक भीषण आग लागली. टर्बाइनमध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत अनेक उपकरणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी प्रचंड प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या अपघातात एका इंजिनीअरचा मृत्यू झाला. आगीच्या कारणांचा शोध सुरू आहे. मोहिद्दीनपूर साखर कारखान्यातून अचानक धूर दिसू लागला. त्यामुळे कर्मचारी आणि लोक कारखान्याकडे धावले. यावेळी आग लागल्याचे उघड झाले.

आज तकमधील वृत्तानुसार, मेरठचे जिल्हाधिकारी दीपक मीणा यांनी सांगितले की, या घटनेचा तपास करण्यासाठी कर्नालमधून पथक पाठविण्यात येत आहे. कारखाना सुरू होऊ शकतो की नाही याची तपासणी केली जाईल. अन्यथा शेतकऱ्यांचा ऊस दुसऱ्या कारखान्यांकडे ट्रान्सफर केला जाईल. आग आटोक्यात आणण्यासाठी सात गाड्यांनी प्रयत्न केले. आगीने झालेल्या नुकसानाची आढावा घेतला जात आहे. या अपघातात जखमी झालेले इंजिनीअर नरेंद्र कुशवाहा यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कारखान्यात केमिकल गोदामातील ड्रममध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी खास प्रयत्न करावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here