फिजी: ऊस जाळण्याचे प्रकार वाढल्याने फिजी शुगर कॉर्पोरेशन चिंतेत

254

सुवा : लाबासा आणि रारावाई साखर कारखान्यांच्या क्षेत्रात अंदाधुंदपणे ऊस जाळण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याने फिजी शुगर कॉर्पोरेशनची (एफएससी) चिंता वाढली आहे. एफएससीचे रजनीश नारायण यांनी सांगितले की, या दोन्ही साखर कारखान्यांमध्ये खूप जळालेला ऊस गाळपासाठी येत आहे.

येथे जळालेल्या उसाचे गाळप करण्यासाठी वेळ उपलब्ध नाही. ऊस का जळत आहे हे शोधणे मुश्किल बनले आहे. काही शेतकरी पिक वाळल्यानंतर ऊस जाळतात. मात्र, आसपासच्या शेतांमध्ये ही आग पसरून तेथील उभा ऊस पेट घेत असल्याचे दिसून येते.

जळालेल्या उसापासून निर्मिती केलेल्या साखरेची गुणवत्ता कमी असते. शेतकऱ्यांनी ऊस जाळण्यापासून वाचवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here