फिजी : दीर्घकालीन विकासासाठी फिजी शुगर कॉर्पोरेशनला हवे पाठबळ

212

सुवा : आर्थिक घडामोडींवर देखरेख करणाऱ्या स्थायी समितीने २००७-२०१९ या कालावधीतील वार्षिक अहवालांच्या पडताळणीनंतर फिजी शुगर कॉर्पोरेशनची (एफएससी) कामगिरी खूप उत्साहवर्धक नाही असा निष्कर्ष काढला आहे. साखर उद्योगाच्या दीर्घकालीन स्थिरतेसाठी एफएससीला पाठबळ देण्याची गरज असल्याचे समितीने म्हटले आहे. फिजी साखर मंडळाने केलेल्या महत्त्वपू्र्ण कामगिरीची नोंद समितीने घेतली आहे.

एफएससीने या कालावधीत अनेक नव्या योजना सुरू केल्या. त्या सुरुच ठेवाव्या लागतील असे स्थायी समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. समितीने या कालावधीत देशातील उत्पादकांच्या संख्येत झालेल्या घसरणीची नोंदही घेतली आहे. एफएससीने उद्योगांसोबतच व्यापारी बँकांच्या सहयोगाने नव्याने शेतकऱ्यांना या उद्योगात सामावून घेण्यासाठी अधिक चांगले धोरण तयार करण्याची शिफारस समितीने केली आहे. साखर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी तयारी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

समितीच्या म्हणण्यानुसार, एफएससीने आपल्या उत्पादनांची श्रेणी सुधारण्याची गरज आहे. आयसिंग शुगर, साखर सीरप, इथेनॉल, गूळ यामध्ये वैविध्य आणण्याची गरज आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या भांडवल वृ्द्धीसाठी एफएससीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here