फिजीमध्ये साखरेची कमतरता नाही: एफसीसीचा दावा

सुवा : गेल्या काही दिवसांपासून लुटोकामध्ये कोविड १९मुळे लागू केलेल्या लॉकडाउननंतर देशभरात सुपरमार्केटमध्ये साखर शिल्लक नसल्याची वृत्त प्रसिद्ध झाले आहेत. साखरेच्या तुटवड्यामुळे अनेक दुकानांकडून ग्राहकांना फक्त २ किलो साखर देत आहे. एफसीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोएल अब्राहम यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊननंतर साखरेचा पुरवठा कमी झाल्याबाबत पश्चिम आणि मध्य विभागातून ग्राहकांच्या तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत. मात्र, साखरेचा पुरवठा कमी नाही. पुरेशी साखर उपलब्ध आहे.
अब्राहम यांनी सांगितले की, अनेक ग्राहकांनी व्यापाऱ्यांकडून कमी साखर विक्री सुरू असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. आम्ही याची पडताळणी करण्यासाठी सुपरमार्केटमध्ये खास पथक नियुक्त केले. फिजी शुगर कॉर्पोरेशनच्या प्रकल्प व्यवस्थापकांसोबत आम्ही एक बैठकही घेतली. साखरेचा अपुरा पुरवठ्याशी सामना करीत असलेल्या व्यापाऱ्यांना सहकार्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. २७ एप्रिल २०२१ रोजी नवुआमध्ये बेनला ४ टन साखर देण्यात आली. तर लेवुकाला आजच पुरवठा होईल.

विटी लेवूच्या इतर भागात शुक्रवारपासून साखरेचा पुरवठा होईल असे एफएससीने सांगितले. या सोबतच २ किलो साखरेचे पॅकिंग असेल. साखर एक अत्यावश्यक खाद्य पदार्थ असल्याचे अब्राहम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here