फिजी: शुगरकेन ग्रोव्हर्स कौन्सिलच्या रेशमी कुमारी अध्यक्ष

फिजी येथील शुगरकेन ग्वोव्हर्स कौन्सिलच्या अध्यक्षपदी रेशमी कुमारी यांची नियुक्ती झाली आहे. संजय कुमार यांच्याजागी त्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. पंतप्रधान आणि साखर उद्योग मंत्री वोरेक बैनीमारामा यांनी साखर उद्योग अधिनियम १९८४ अनुसार कुमारी यांची नियुक्ती केली आहे.

कुमारी या तेवूआ येथील शेतकरी कुटूंबातील असून त्यांनी जपानमधील त्सुकुबा विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आहे.

Image courtesy of Admin.WS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here