यंदा चांगल्या हंगामाची फिजी शुगर कॉर्पोरेशनला अपेक्षा

सुवा : फिजी शुगर कॉर्पोरेशनचे (एफएससी) मुख्य कार्यकारी अधिकारी भान सिंह यांनी लुटोका कारखान्याच्या गळीत हंगामाचे उद्घाटन केले. यावेळी गेल्या दोन ते तीन वर्षांतील हंगामाच्या तुलनेत चांगल्या हंगामाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, लुटोका कारखान्याने ५,१०,००० टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यातून जवळपास ५०,००० टन साखर उत्पादनाचे ध्येय आहे. यासोबतच सिंह यांनी सांगितले की, साखर मंत्रालयाच्या मंडळाचे सदस्य आणि अधिकारी साखर उद्योगाचे हीत पाहण्यास कटिबद्ध आहेत.

ते म्हणाले, आम्ही ऊस उत्पादक, ऊस वाहतूकदार आणि उद्योगाच्या भागधारकाच्या हितांना महत्त्व देतो. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या सहयोगाने उद्योगाच्या सकारात्मक भविष्याला बळ मिळेल. सध्या त्याची आपल्याला गरज आहे. यावर्षी वीस लाख टन ऊस मिळविण्याचे एफएससीचे लक्ष्य आहे. रावराई साखर कारखान्याचे गाळप ७ जुलैपासून सुरू होईल असे त्यांनी सांगितले.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here