फिजी चे पंतप्रधान यांनी घेतली शेतकर्‍यांची भेट

सुवा, फिजी: फिजी चे पंतप्रधान बॅनीमारामा यांनी वनुआ लेवू मध्ये नसरवाका, बुआ आणि वुसीतोका, सीक्काका बस्ती येथील ऊस शेतकर्‍यांची भेट घेतली. पंतप्रधान बॅनीमारामा यांच्या बरोबरच्या बैठकी दरम्यान शेतकर्‍यांनी पाण्याची समस्या, शाळांची दुरुस्ती, खराब रस्ते आणि बोर(कूपनलिका) सारख्या अनेक समस्या मांडल्या. हे शेतकरी फिजी साखर उद्योगाद्वारे स्थापित जमींनदारी युनिट सहयोग उपक्रमांचा भाग आहेत. फिजी शुगर कॉर्पोरेशन या व्यवस्थेअंतर्गत शेतकर्‍यांना पैसे मिळवून देण्यासाठी जमींनदारी युनिटच्या मालकी असणाऱ्या निष्क्रिय जमिनीचा उपयोग करेल. फिजी शुगर कॉर्पोरेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राहम क्लार्क यांनीही फिजी चा साखर उद्योग चालवण्यातील त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी पंतप्रधान बॅनीमारामा यांना धन्यवाद दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here