आर्थिक वर्ष 2019-20 साठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली

178

नवी दिल्ली: आयकर विभागाने सांगितले की, आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे.

आयकर विभागाने सांगितले की, या कठीण परिस्थितीला लक्षात ठेवून आम्ही आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवून 30 नोव्हेंबर 2020 करण्याचा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाने शनिवारी ट्वीट करुन ही माहिती दिली.

केंद्र सरकार ने यापूर्वी 2018-19 साठी संशोधित आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2020 पर्यंत वाढवली होती. आधार ला पॅनकार्ड शी जोडण्याची तारीखही,31 मार्च, 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here