विलास कारखान्याच्या गाळप क्षमता, साखर गुणवत्तेत सुधारणा होणार : श्रीमती वैशालीताई देशमुख

लातूर : विलास सहकारी साखर कारखाना (युनिट वैशालीनगर, निवळी) येथील कारखान्याच्या अंतर्गत आधुनिकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत बसविण्यात आलेल्या नवीन मिल रोलरचे पूजन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे विलास कारखान्याच्या गाळप क्षमतेत आणि साखरेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होणार आहे.

विलास सहकारी साखर कारखान्यात गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू आहे. या अनुषंगाने कारखान्यात बसविण्यात आलेल्या नवीन मिल रोलरचे पूजन ६ सप्टेंबर २०२३ रोजी चेअरमन श्रीमती वेतालाई विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थिती करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ बिडवे, नारायण पाटील, रंजीत पाटील, गोविंद दुरे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, जानीया पडिले आदी उपस्थित होते.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे तंत्रज्ञानी कारखान्याच्या मशिनरीची पाहणी केली. गाळप हंगामामध्ये या मशिनरीमुळे होत असलेले स्टॉपेजेस तसेच हंगामात मशिनरी बंद पडणे आदी बाबींचा विचार करून मशिनरीमध्ये काही तांत्रिक बदल करणे, नवीन मशिनरी बसविणे व काही मशिनरीमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला होता. त्या अनुषंगाने मिल विभाग, बॉयलर हाऊस, शुगर ग्रेडरमध्ये आधुनिकीकरण करण्यात येत आहे. मशिनरी आधुनिकीकरणामुळे कारखाना मेंटेनन्स खर्चात बचत होऊन कारखाना कार्यक्षमतेने चालणार आहे. कारखाना आधुनिकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या तांत्रिक बदलामुळे गाळप क्षमतेत वाढ व साखरेच्या गुणवत्तेत सुधारणा होणार आहे. श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी या प्रसंगी कारखाना अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच सर्व संचालकांच्या उपस्थितीत खातेप्रमुख, य अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here